<<,"मला माझ्या नाटकात सहभागी दोस्तांना टाळ्या वाजवून, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निवडलं गेलं आहे !">
या कथेत राजूला झालेला आनंद हा कशासाठी तरी निवड झाल्याचा आहे, प्रतिसाद देण्यातला नाही. न निवडता कार्यक्रमाला स्वखुशिने प्रतिसाद देण्यातल्या आनंदाला राजू मुकला असे मला वाटते.
टाळ्या वाजविण्यासाठी मुले निवडुन त्यांना टाळ्या वाजविण्यास सांगणे याला उस्फुर्त प्रतिसाद कसे काय म्हणता येइल?
हे पटत नाही. मुले मुळात निर्मळ मनाची व खुल्या अंतःकरणाची असतात. त्यांना जे आवडते त्याला ते उस्फुर्त प्रतिसाद नक्किच देतात. शिवाय आपली मित्र-मंडळी काहीतरी वेगेळ्या रुपात मंचावर आली आहेत आणि आपण त्यांना पाहिलाय, ओळखलाय हा आनंद ती लपवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शाळेतील शिक्षकांनी टाळ्या वाजवाला मुले निवडावीत हे कशाचे लक्षण म्हणावे? त्यांना बसवलेल्या कार्यक्रमाची फारशी खात्री वाटत नाही याचे की सादर करणाऱ्या मुलांना तो जमेल की नाही याची खात्री वाटत नाही याचे? उलट कार्यक्रम वर आणण्यासाठी पित्ते असले पाहिजेत असा चुकीचा धडा तर हे शिक्षक देत नाहीत ना?
वेदश्री, नकारात्मक प्रतिसादाबद्दल क्षमस्व, पण खटकले म्हणून लिहिले.