मधआपल्या संस्कृतीमध्ये मुलीचा विवाह ८ वर्षाच्या आत करायची पद्धत होती त्यामुळे विवाहपूर्व शरीरसंबंधांची समस्या त्यावेळी नव्हती. ती प्रथा पुन्हा सुरू केल्यास या समस्येचे समूळ उच्चाटन होईल

वा इनायक राव! फॉरीनला जाउन शोध निबंध लीवनारे इद्वान तुमिच का ते? ह्यावर तोडगा काय म्हनं तर बाल विवाह सुरु करावा? ह्यो तुमचा उपहास का काय म्हनत्यात त्यो हाये का? इनायक राव कुटल्या मध्ययुगीन काळात राहताय आपन? ह्या असल्या इचारांना मी तरी साफ खुळचट इचार समजतो. असल्या इचारांच समर्थन करनारं प्रतिसादबी हीत येनार (तशी इद्वान मंडळी काय कमी न्हाइत हीतं) तेव्हा त्या सर्वासनी आपली आधीच जाहीर शरनागती! त्येंच्याशी ह्यावर वाद घालनं म्हनजे मी माज्या आदीच कमी असलेल्या बुद्दीचा अपमान समजतो! निदान काही टाळक्यांनी असल्या येडपट इचारांना इरोध तरी करावा येवडी माफक अपेक्शा!!

जाता जाता- इनायक राव तुमच लगीन बी वय वर्स ८ असताना झाल्याल हाये का? नसलं तर लै हळहळत असाल नव्हं? काय करनार आपला सगळा समाज फॉरिनच्या लोकांचं आंदळं अनुकरन करत असल्यान असं झाल्यालं दिसतयं तुमी सोत्ता फॉरीनला जावून बसलाय तवा तुमीच ही प्रथा तिकडंबी सुरु करा हीतं लगेच लोकं तसच करत्यात बगा!