(२५/०६/२००६)

लिखाण ठीक आहे,

--- धन्यवाद

लिखाणाचा फॉर्म एकसारखा नाही. कधी रोमान्स कधी प्रणय, कधी ग्रॅज्युएशन कधी पदव्योत्सव(?), कधी "फुल्ल व्हॉल्युमवरचे म्युझिक" कधी "मेहनतपूर्वक विकसित केलेली कला" ह्यामुळे कधी स्पीडब्रेकरवरून आणि कधी खड्यातून गेल्यासारखे वाटले.

--- सहमत आहे. कथेच्या आवेगात लेखनाच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्षच झाले आहे असे वाटते.

जास्त इंटेंसिटी आणण्यासाठी केलेल्या शब्दरचना कृत्रिम वाटतात. "लटक्या रागाने फुरंगटून जाऊन", "मैत्रीच्या या विणेत आयुष्यभराच्या कायमच्या सोबतीचे टाके घातले." इ. इ.

--- मला नाही तसे वाटत.

बाकी कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील मुलामुलींना आवडण्यासारखे आहे.

--- तुमच्या प्रतिसादावरून कथा(विषय, मांडणी वगैरे वगैरे) तुम्हाला आवडली की नाही हे पक्के कळत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या अवस्थेतील वाचक आहात हे(ही) कळत नाही. सबब, लेखनातील सुधारणा इ. करावयाच्या झाल्यास मनोगतावर एक जनगणना करून त्यावरून वाचकांचे लिंग, वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, (शारीरिक तसेच मानसिक अवस्था!) इ. मुद्द्यांचा विचार सगळ्याच रचनाकर्त्यांनी करावा की काय असा विचार मनात डोकावतो आहे.  त्यामुळे लेखनाच्या आकृतीबंधाबाबत, कोणाला आवडेल कोणाला नाही हे ठरवण्याअगोदर, रचना नि मांडणी याबाबत काही विधाने करण्याअगोदर (तुमच्यासारख्या जाणकार) वाचकांनी आपला 'बायोडेटा' (इन्क्लुडिंग 'अवस्था' !) सांगितल्यास उत्तम. म्हणजे त्यानुसार पुढील रचनांमध्ये सुधारणा करता येतील, नाही का?

"तुम्ही 'अचाट' लिहिता" या आगाऊरावांच्या निरीक्षणाशी सहमत आहे.

--- मी असहमत आहे.

प्रामाणिक मत, राग नसावा.

--- हेच!

(३०/०५/२००६)

ता. क. - हे मत या लिखाणाबद्दल आहे, लेखकाबद्दल नाही.

--- हे कोणाबद्दल बोलताय कळले नाही. कारण कथा 'लेखक'लिखित नाही.