जास्त इंटेंसिटी आणण्यासाठी केलेल्या शब्दरचना कृत्रिम वाटतात. "लटक्या रागाने फुरंगटून जाऊन", "मैत्रीच्या या विणेत आयुष्यभराच्या कायमच्या सोबतीचे टाके घातले." इ. इ.
--- मला नाही तसे वाटत.
तुम्हाला तसे वाटत नाही हे उघडच आहे, तसे वाटत असते तर तुम्ही असे लिहिलेच नसते. लेखकाला/लेखिकेला आपल्या लिखाणातील दोष कळले असते तर सगळेच लेखन निर्दोष झाले असते. वाचकांचे अभिप्राय यासाठीच महत्त्वाचे असतात असे वाटते, फक्त ते मोकळ्या मनाने घेतले पाहिजेत. असो.
बाकी कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील मुलामुलींना आवडण्यासारखे आहे.
--- तुमच्या प्रतिसादावरून कथा(विषय, मांडणी वगैरे वगैरे) तुम्हाला आवडली की नाही हे पक्के कळत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या अवस्थेतील वाचक आहात हे(ही) कळत नाही. सबब, लेखनातील सुधारणा इ. करावयाच्या झाल्यास मनोगतावर एक जनगणना करून त्यावरून वाचकांचे लिंग, वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, (शारीरिक तसेच मानसिक अवस्था!) इ. मुद्द्यांचा विचार सगळ्याच रचनाकर्त्यांनी करावा की काय असा विचार मनात डोकावतो आहे. त्यामुळे लेखनाच्या आकृतीबंधाबाबत, कोणाला आवडेल कोणाला नाही हे ठरवण्याअगोदर, रचना नि मांडणी याबाबत काही विधाने करण्याअगोदर (तुमच्यासारख्या जाणकार) वाचकांनी आपला 'बायोडेटा' (इन्क्लुडिंग 'अवस्था' !) सांगितल्यास उत्तम. म्हणजे त्यानुसार पुढील रचनांमध्ये सुधारणा करता येतील, नाही का?
"कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील मुलामुलींना आवडण्यासारखे आहे" याचा अर्थ कोणालाही कळावा. यासाठी व्यक्तिशः माझ्यावर आणि माझ्या अवस्थेवर घसरायची आवश्यकता नव्हती, पण मी समजू शकतो. बाकी जनगणना वगैरे अगदीच असंबद्ध आणि अनावश्यक असलेला भाग लेखनशैली म्हणून सोडून देतो.
ता. क. - हे मत या लिखाणाबद्दल आहे, लेखकाबद्दल नाही.
--- हे कोणाबद्दल बोलताय कळले नाही. कारण कथा 'लेखक'लिखित नाही.
याने काय फरक पडतो? हे मत केवळ लिखाणाबद्दल आहे, कोण लिहिले आहे हे गौण आहे. लेखक/लेखिका पाहून मत देण्यापेक्षा लेखन पाहून दिलेले मत आहे. (या प्रतिसादाच्या परिणामी "लेखक"लिखित प्रतिशोधपर प्रतिसाद इतरत्र आले होते, तो एक योगायोग म्हणून सोडून देतो.)
शिवाय मनोगतावर स्त्री म्हणून वावरणारा/री स्त्री असेलच याची खात्री देता येत नाही (तुमच्या स्त्रीत्वावर मला शंका घ्यायची नाही, पण हे खरे आहे.)
एकूणच सर्वांनी लेखनाविषयीचे प्रामाणिक मते खिलाडूवृत्तीने आणि प्रगल्भतेने घ्यावीत असे वाटते.