तुम्हाला तसे वाटत नाही हे उघडच आहे, तसे वाटत असते तर तुम्ही असे लिहिलेच नसते. लेखकाला/लेखिकेला आपल्या लिखाणातील दोष कळले असते तर सगळेच लेखन निर्दोष झाले असते. वाचकांचे अभिप्राय यासाठीच महत्त्वाचे असतात असे वाटते, फक्त ते मोकळ्या मनाने घेतले पाहिजेत. असो.
--- "मला तसे वाटत नाही", हे माझे मत लेखनापूर्वीचे नसून आपल्या प्रतिसादातील टिप्पणीवरील विचाराअंतीच मांडले आहे, हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. हे "मला (अजूनही) असे वाटत नाही" असे लिहायला हवे होते. असो.
"कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील मुलामुलींना आवडण्यासारखे आहे" याचा अर्थ कोणालाही कळावा. यासाठी व्यक्तिशः माझ्यावर आणि माझ्या अवस्थेवर घसरायची आवश्यकता नव्हती, पण मी समजू शकतो. बाकी जनगणना वगैरे अगदीच असंबद्ध आणि अनावश्यक असलेला भाग लेखनशैली म्हणून सोडून देतो.
--- व्यक्तिशः कुणावर घसरायचा प्रश्नच येत नाही. कथा आवडण्या-नावडण्यासंबंधीचे विधान ही कथा 'वाचक' म्हणून 'तुम्हांला' (पौगंडावस्थेतील/महाविद्यालयीन वाचकांना नव्हे) कशी वाटली, या संदर्भात मला कळले नसल्याने तुमच्या अवस्थेसंबंधी प्रश्नचिह्न निर्माण झाले. प्रतिसाद कोणा महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील/इतरावस्थेतील वाचकाने दिला की तुम्ही एक चिकित्सक वाचक म्हणून दिलात यात मला तरी तो तुम्ही एक चिकित्सक वाचक म्हणून दिलात असे वाटले (कारण माझ्या लेखनशैलीची, फ़ॉर्मची वगैरे चिकित्सा तुम्ही केलीच आहेत, जे लेखनातील सुधारणेच्या दृष्टीने चांगलेच आहे. तसेच वाचकांचे अभिप्राय यासाठीच महत्त्वाचे असतात असे तुम्हाला वर वाटलेच आहे) (खिलाडू वाटाणाऱ्या)तुम्ही ते वैयक्तिकरित्या घेतले याला तुमचा (कोणतातरी)गंड समजायचे की माझ्या लिखाणातील (अगर शैलीतील असंख्य दोषांपैकी एक) दोष समजायचे हा निर्णय तुमचा(च)!
याने काय फरक पडतो?
--- नक्कीच पडतो. लेखन हे 'लेखक'लिखित नाही, याचेही भान न ठेवता (बेभान) प्रतिसाद देणाऱ्यां वाचकांच्या प्रतिसादांवर रचनाकर्त्यांनी कितपत भरवसा ठेवून आपल्या लेखनातील सुधारणांबाबत विचार करावा? जबाबदार वाचक आणि तसेच प्रतिसाद असतील तर रचनेच्या बाबतीत नक्कीच विचार करता येतो.
हे मत केवळ लिखाणाबद्दल आहे, कोण लिहिले आहे हे गौण आहे. लेखक/लेखिका पाहून मत देण्यापेक्षा लेखन पाहून दिलेले मत आहे. (या प्रतिसादाच्या परिणामी "लेखक"लिखित प्रतिशोधपर प्रतिसाद इतरत्र आले होते, तो एक योगायोग म्हणून सोडून देतो.)
शिवाय मनोगतावर स्त्री म्हणून वावरणारा/री स्त्री असेलच याची खात्री देता येत नाही (तुमच्या स्त्रीत्वावर मला शंका घ्यायची नाही, पण हे खरे आहे.)
--- अगदीच असंबद्ध आणि अनावश्यक असलेला हा भाग लेखनशैली म्हणून सोडून देता येण्याजोगा
एकूणच सर्वांनी लेखनाविषयीचे प्रामाणिक मते खिलाडूवृत्तीने आणि प्रगल्भतेने घ्यावीत असे वाटते.
--- सहमत