कथा अगदीच काहीहीही आहे.
त्याची आई - सरला, तिला माहिती होतं की राजूची किती जबरदस्त इच्छा आणि अपेक्षाही आहे की त्याला निवडलं जावं नाटकासाठी,
हेच वाक्य,
'आपलीही नाटकासाठी निवड व्हावी' अशी आपल्या लेकाची किती तीव्र इच्छा आहे हे एक आई म्हणून सरलाला माहीत असणं अगदी स्वाभाविकच होतं!
अशाही तऱ्हेने लिहिले असते तर अधिक परिणामकारक ठरले असते असे वाटते. तरी स्वैर अनुवाद करताना कृपया वाक्यरचनेकडे लक्ष द्यावे ही सूचनावजा विनंती! वरील वाक्य हे शब्दशः भाषांतरित केलेले असल्यास उगाच त्याला "स्वैर अनुवाद" सारखे मोठमोठे शब्द वापरू नयेत असे वाटते. स्वैर अनुवाद वाचताना अनुवादकाराची लेखनशैली, 'आपण मूळ लेखकच वाचतो आहोत' असे वाटावे इतपत समृद्ध असावी असे आम्हास वाटते.
असो. पुन्हा मूळ विषयाकडे वळूया.
तो उत्साहाने उद्गारला,"मला माझ्या नाटकात सहभागी दोस्तांना टाळ्या वाजवून, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निवडलं गेलं आहे !"
१) हे वाचून लहानग्या राजूची नाटकात निवड झालेली नाही हे समजते.
त्याची आई - सरला, तिला माहिती होतं की राजूची किती जबरदस्त इच्छा आणि अपेक्षाही आहे की त्याला निवडलं जावं नाटकासाठी,
२) असे असताना, लहानगा राजू निवड न झाल्यामुळे हिरमुसला न होता, निवड झालेल्या त्याच्या इतर वर्गमित्रांना मोठ्या उदार मनाने टाळ्या वगैरे वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याइतपत लहानगा रहात नाही, हे पचत नाही.
त्याचे डोळे अलोट अभिमान, उत्साह, आनंद यांच्या संमिश्र भावनेने लकाकत होते.
२) शिवाय हे आपल्या मातोश्रींना सांगताना लहानग्या राजूचे डोळे अलोट अभिमान, उत्साह, आनंद यांच्या संमिश्र भावनेने लकाकत होते हे तर अगदीच हास्यास्पद वाटते. (कदाचित लहानगा राजू मंदबुध्दी असावा!ः)
असो. तरीही आम्हाही आपल्या या इटुलूपिटुलू (!) कथेला टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहोत.
राजीव अनंत भिडे.