संयुक्ताबाई,
मी माझे शब्द मागे घेतो. बिनशर्त माफीची कलमे खालीलप्रमाणे

  1. या लिखाणाचा फॉर्म अगदी एकसारखा, एकजिनसी आहे.
  2. शब्दरचना अगदी अकृत्रिम आणि नैसर्गिक आहे.
  3. कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सर्वांना आवडण्यासारखे आहे. 
  4. तुम्ही लेखिकाच आहात, लेखक नाही.
  5. "लेखक/लेखिका पाहून मत देण्यापेक्षा लेखन पाहून मत द्यावे." हे असंबद्ध आणि अनावश्यक आहे.

याशिवायही काही कलमे आवश्यक वाटल्यास ती अंतर्भूत आहेत असे मानून उदार मनाने क्षमा करावी (सर्व अपराधांची क्षमा मागितल्याने मूळ लेखाच्या लांबीशी स्पर्धा करणारे प्रगल्भ भाषेतील परिपक्व प्रतिसाद न दिल्यास माझे अहोभाग्य!)

आपला,
(क्षमाप्रार्थी) शशांक