या दूरच्या दूर ओसाड जागी किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिकाभाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काळहस्तामुळे ही हिला या पहा जागजागी फटा
माती खडे आणि आहेत काही हिच्याभोवती भंगलेल्या विटा

---

ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे.

आपला
(उजाड) प्रवासी