शशांकराव,
माफीपत्राची मागणी किंवा अपेक्षा दोन्हीपैकी काही केल्याचे मला तरी आठवत नाही. त्यामुळे प्रस्तुत माफीपत्राचे प्रयोजन अनाकलनीय आहे. कलम १ पूर्णपणे अप्रस्तुत आहे, कारण त्याबद्दल वाचक म्हणून म्हणून केलेली टिप्पणी/आरोप आधीच्या प्रतिसादात मान्य केली/ला आहे. कलम ४,५ विषयी काही मतमतांतरे माझ्या बाजूने मांडलीच गेली नव्हती. त्यामुळे ती कलमेही अप्रस्तुत ठरतात. सबब, माफीपत्राकडे माझ्या वतीने दुर्लक्ष समजावे आणि आतापर्यंत माझे काही चुकले असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी.
या प्रतिसादाची लांबी मूळ लेखापेक्षा कमी आहे, हे तुम्हालाही जाणवले असेलच अशी आशा आहे.
(क्षमाप्रार्थी)संयुक्ता