मऱ्हाटी मानसांचा कट्टा किवा मनोगताचा कट्टा म्हंजी समदं मऱ्हाटीच पायजे असं कुटं लिवलंया दावा की राव! मऱ्हाटीचा हट्ट/आग्रह हवा ह्ये कबुल पन दुराग्रह का काय म्हनत्यात त्यो लै वाइट असंतुया. अति थेते माती ना व्हं? बाकी कलेच्या परांतात भाषिक मरयादा आनि भाडंनं आनू नयेत असं कोनीतरी शान्याने सांगितल्याचं आटवत होतं. पन त्यो लेकाचा कसला हुबा ऱ्हातुय तुमच्याम्होरं! म्हनूनच तुमीबी कट्ट्यावर असत्यात तर तुमास्नी ही मऱ्हाटीची आठवन करून देता आली आस्ती समद्यास्नी, कस्सं?