एकदा दिलेला प्रतिसाद संपादित करून पुनर्प्रकाशित करण्याची सोय काढून टाकण्यात आलेली दिसते. त्यामुळे आधीच्या प्रतिसादात लिहायचे अनवधानाने राहून गेले त्यासाठी हा प्रतिसाद.

मनोगतावरील सदस्यत्त्वाच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल अनेक शुभेच्छा. वर्षभरात आपल्या हातून ज़े ज़े छान वाचायला मिळाले त्यात उत्तरोत्तर अशीच वृद्धी होत राहो आणि आम्हांला वाचनाचा आनंद असाच मिळत राहो, ही सदिच्छा. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.