श्री‌. शरद कोर्डे यांच्या चर्चाप्रस्तावात त्यानी बलात्काराचे समर्थन केले आहे असे वाटत नाही.प्रश्न उरतो तो वेषभूषा बलात्काराला कारणीभूत होते अथवा नाही. आपण घराचा बंदोबस्त कितीही केला तरी चोरी व्हायची असेल तर होतेच म्हणून घर कोणी उघडे टाकून जात नाही,आणि एकादा घर उघडे टाकून गेला आणि त्याच्याकडे चोरी झाली तर आपण चोराला दोष देतोच पण त्याचबरोबर घर उघडे टाकून जाणाऱ्याला पण मूर्ख म्हणतो‍. ज्वालाग्राही पदार्थाचा साठा घरात ठेवणे हाही असाच मूर्खपणा पण तोही काही लोक करतात आणि त्यामुळे त्यांच्या घराबरोबर शेजारी जे या कृत्याशी संबंधित नसतात त्यांचाही नाहक बळी जातो. त्यामुळे बलात्कार होणाऱ्या स्त्रियानी भडक उत्तान कपडे घातलेले नसतात तरी त्यांच्यावर बलात्कार होतो असे त्या कपड्यांचे समर्थन करणे योग्य नाही. पाश्चात्य देशात स्त्रियांवर बलात्कार होण्याचे प्रकार आपल्या देशायेवढेच होतात.तेथे तर एकटी दुकटी स्त्री दिसली तर तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्याचेच प्रयत्न होतात अशी एकादी तरी बातमी दररोज ऐकायला मिळते.बलात्काराचे समर्थन कोणीही करणार नाही पण तो आपल्यावर आणि  आपल्या  भगिनींवर होऊ नये याची काळजी स्त्रियानी घ्यायलाच हवी.