नको येऊस संगती
सारे काटे माझ्यापाशी...
तुझ्या शीतल प्रीतीला
आग सोसावी रे कशी...

प्रेरणा,
चारोळीतील तरल,हळुवार भावना आवडली.
पण,  ४ थ्या ओळीतील  'आग' २ ऱ्या ओळीतील 'सारे काटे माझ्यापाशी' शी सुसंगत वाटत नाही. या ऐवजी

नको येऊस संगती
सारे वणवे माझ्यापाशी
तुझ्या शीतल प्रीतीला
आग सोसावी रे कशी.......कसे वाटते?

प्रामाणिक सूचना . राग नसावा!
जयन्ता५२