बऱ्याच दिवसांपूर्वी  म. टा. मध्ये वाचलेला हा लेख चांगलाच लक्षात राहिला. यामधील सर्वच मुद्दे मला १००% पटले.
आता "स्त्रियांची वेषभूषा आणि बलात्कार" याबद्दल बोलायचे झाले तर पहिला घटक दुसऱ्याला नक्कीच पूरक आहे पण तेवढेच एक कारण मात्र निश्चित नाही. उत्तान वेषभूषा पाहून भावना उद्दीपित होतात पण भावनांना आवर घालता येणे हाच मानव आणि पशू यांच्यातील फरक नाही काय?
पत्नीच्या वेषभूषेमुळे पतीची कामभावना उद्दीपित होणे सर्वमान्य आहे पण दोघांपैकी कोणीही स्थळकाळाचे भान विसरणे कधीही योग्य होणार नाही.