आतापर्यंत आलेले (एकूण साडेचार) प्रतिसाद पुढीलप्रमाणे:

(अकारविल्हे क्रमाने)
- एकलव्य (अर्धा प्रतिसाद - वरीलप्रमाणे. उत्तर दिलेले नाही.)
- छायाताई
- भोमेकाका
- विश्वमोहिनी (वरदाताई)
- सातीताई

आतापर्यंतच्या प्रतिसादांतून अपेक्षित उत्तर आलेले नाही.

मंगळवार संध्याकाळपर्यंत (EDT - भारतीय वेळेप्रमाणे बुधवार सकाळपर्यंत) वाट पाहून उत्तर छापावे म्हणतो.

एक स्पष्टीकरण करणे इथे इष्ट आहे. दुकानातल्या सर्वच घड्याळांत वेगवेगळ्या वेळा दर्शवल्या जातात - केवळ बंद पडलेल्या / दुरुस्तीला आलेल्या घड्याळांत नव्हे. विक्रीसाठी असलेली चालू स्थितीतली घड्याळेसुद्धा वेगवेगळ्या वेळा दर्शवतात.

आणि हे केवळ योगायोगाने होत नसून काही कारणाकरिता मुद्दाम केले जाते, असे वाटते. (सॉफ्टवेअरच्या परिभाषेत सांगायचे झाले, तर It is not a bug. It is a feature.) आणि हेच कारण शोधावयाचे आहे.

आणखी एक हिंट: 'हम होंगे कामयाब'. (या गाण्याचे एक वैशिष्ट्य.)

पहा प्रयत्न करून!

- टग्या.