वेदश्री, नकारात्मक प्रतिसादाबद्दल क्षमस्व, पण खटकले म्हणून लिहिले.

सर्वसाक्षी, तुमच्या या वाक्यानेच उलट वाईट वाटलं. खटकलं ते बोलून दाखवलंत हे खूप छान वाटलं. मूळ लेखनाबद्दलचे प्रतिसाद देणाऱ्याचे खरे विचार कळणे हेच तर महत्त्वाचे असते. असो.

टाळ्या वाजविण्यासाठी मुले निवडुन त्यांना टाळ्या वाजविण्यास सांगणे याला उस्फुर्त प्रतिसाद कसे काय म्हणता येइल?

टाळ्या वाजवण्यासाठी राजूला निवडले गेलेले नाही. नाटकात काम करायला मिळाले तरच काहितरी ग्रेट आणि प्रेक्षकांमध्ये बसून त्याचे रसग्रहण करणे यात काहीच नाही, ही भावना कशी चुकीची आहे हे मला वाटते राजूच्या शाळेत मुलांच्या कलाने घेऊन सांगितली गेली असावी. कदाचित म्हणूनच नाटकात भाग घ्यायला न मिळतादेखिल प्रेक्षक होण्याचं 'भाग्य' मिळणार आहे याचा आनंद राजूला झाला आहे. नाटकात भाग घेऊ शकणाऱ्यांमध्ये सामील करून न घेतल्यानेच त्या नाटकाचा प्रेक्षक होण्याचे भाग्य मिळाले म्हणून 'निवडलं गेलं आहे' असा शब्दप्रयोग आला आहे. प्रेक्षकांची निवडणूक झालेली नसून प्रतिसाद देण्यातल्या आनंदाची जाणिव करून दिली गेली आहे, असे वाटते.

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

कथेबद्दलचे उपरोल्लिखित विचार हे माझे स्वतःचे आहेत. मूळ कथाकाराचे विचार याहून सुंदर आणि नेमके असतील याबाबत शंका नाही.