राजीव_अनंत,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
स्वैर अनुवाद करताना कृपया वाक्यरचनेकडे लक्ष द्यावे ही सूचनावजा विनंती!
पुढील अनुवादांमध्ये आपली ही सूचना मी नक्कीच पाळायचा प्रयत्न करेन. आपण बदल सुचवलेले वाक्य.. त्यावर मी खूप विचार केला ( माझ्या कुवतीनुसारच ! ) पण नेमके कसे अनुवादीत केल्यास जास्त छान होईल ते कळले नाही. मी माझ्या सरधोपट शैलीमध्ये (!) अनुवाद ( शब्दशः भाषांतर नाही ) केला. त्याच वाक्याच्या वाक्यरचेनेबद्दल तुम्ही केलेली सुचवण खचितच खूप छान आहे. खूप आवडली. त्याकरता मनापासून धन्यवाद.
स्वैर अनुवाद वाचताना अनुवादकाराची लेखनशैली, 'आपण मूळ लेखकच वाचतो आहोत' असे वाटावे इतपत समृद्ध असावी असे आम्हास वाटते.
अगदी खरे आहे. माझी लेखनशैली एकूणातच धन्य असल्याने मूळ कथेला योग्य तो न्याय देऊ शकले नाही अशी रुखरुख वाटत आहे. पुढील वेळेस प्रयत्न करताना या सूचना नक्की ध्यानात ठेवेन.
अवांतर : 'इटुलूपिटुलू' हा शब्द माझ्या ऐकण्याबोलण्यात तरी 'इटलूपिटलू' असा आहे.