या प्रश्नावर इतक्या विविध प्रकारे विचार होउ शकतो याची कल्पना नव्हती. अगदी बालविवाहापर्यंत. मी डॉ. माधवी गाडगीळ यांच्याशी सहमत आहे.
आत्तापर्यंतच्या चर्चेवरून बहुमत असे दिसते विवाह झालाच पाहीजे. त्याशिवाय जीवन सफ़ल होणार नाही मग भलेही भरमसाठ हुंडा द्यावा लागो. काहीही करून एकदाचे लग्न झाले की जीवनाची  इतिकर्तव्यता झाली. लग्न केले, दोन मुले झाली की "सेटल" झालो.
हा समज कितपत बरोबर आहे?
समजा एखाद्याला विवाह करायचा नसेल तर? आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात.काही लोकांशी चटकन तारा जुळतात, काहींना समजून घेण्यात आयुष्य जाते. जर सहजीवन व्यतीत करावे असा सुजाण जोडिदार मिळाला तर लग्न ही एक औपचारिकता होउन जाते.

हे वैयक्तिक मत आहे. आणि बहुमताच्या विरुद्ध आहे. पण यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.