वेदश्री,
कथा खुपच छान आहे. कथेवरील संमिश्र प्रतिसाद वाचून करमणूक झाली. म्हणजे प्रतिसाद या विषयावरील कथेला मिळालेले प्रतिसाद पाहून "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे पुन्हा एकदा पटले. विषेशतः राजीव यांचा प्रतिसाद आणि तुम्ही त्यावर दिलेले उत्तर हे सुद्धा विचार करायला भाग पाडतात.
एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर ती गोष्ट त्या व्यक्तीला न दुखावता तिच्या नजरेस आणून देणे हे किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा कळाले. त्याचप्रमाणे, कोणी कितीही लागेल अशा प्रकारे टीका केली तरी त्याला संयमीतपणे उत्तर देणं सुद्धा खरं तर अवघड आहे. पण तेसुद्धा जमलं पाहीजे.
असो. लिहीत रहा. अनेक जणांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असतील... माझ्यासकट...!
मित्र,
योगेश.