नमस्कार,
मी संदीप, पण आई-वडील-भाऊ-नातेवाईक सोडून सगळे मला नाना म्हणतात.
मी अभियंता आहे. ऑग़स्ट मधे पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे.
मला, शास्त्रीय - सुगम संगीत ऐकायला आवडतं.
मी सचिन चा भक्त आहे.
मिसळ माझा जीव की प्राण आहे.
पाऊस , धबधबे माझ्यासाठी स्वर्ग आहेत.
गणपतीत नाचायला आवड्तं.
मित्रांशी गप्पा टाकायला आवड्त.
तात्या अभ्यंकरांनी शेवट्ची इच्छा सांगीतली म्हणून मी पण सांगतो-
मी नाचतोय , कानाला हेड्फ़ोन आहे, त्यावर पं. भिमसेन जोशींचं 'सखी शाम नही आयो' (छाया मल्हार) ऐकतोय, समोर सचिन धो-धो धोपटतोय, तूफ़ान पाऊस पडतोय आणि त्यात मिसळच्या प्रत्येक घासाचा आनंद घेतोय..... या साठी लाख मरणं पत्कारेन.
-- नाना