नाव - प्रिया
सदैव लढण्याच्या पावित्र्यात असल्याने भावाचे आडनाव मनोगतावर लावते. "ब्रुस ली" चं हो.

व्यवसाय - संगणक क्षेत्रातून PL च्या जागेवरुन रजा घेतल्यावर सध्या घरातच लीडर. फावल्या वेळात लष्कराच्या भाकऱ्या भाजायला आवडतात.

आवड - चांगल्या आवडी चांगल्या लोकांसारख्याच. याशिवाय,
१. टारगटपणा करायला आवडतो.
२. आपल्या लोकांना थोडसं सतवायला आवडते.
३. त्रास देऊन झाल्यावर त्यांची माफी मागायला ही आवडते.

बाकीची माहिती व्यक्तिरेखेत मिळेलच.