वरदाताई व राधिकाताईंशी पूर्ण सहमत आहे.
कशालाही थोतांड ठरविण्याचा अभिनिवेश जरा जास्तच होत आहे असे वाटते.
फलज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तर आधुनिक विज्ञानात तरी सर्व गृहीतके तपासून खरी किंवा खोटी ठरविता येतात असे वाटत नाही. आणि त्यावर त्या त्या उपपत्तींची सत्यता अवलंबून असते असे आता कोणी शास्त्रज्ञ समजत नसावेत.
असेही वाटते की असा ऍप्रोच ठेवला असता तर इर्रॅशनल अंक, कॉम्प्लेक्स अंक, अयुक्लिडीय भूमिती यांचा शोध लागलाच नसता, कारण (आधीच्या पार्श्वभूमीवर) गृहीतकच चूक.
अशाच रीतीने आयुर्वेदालाही सहजासहजी थोतांड ठरवता येते व ऍलोपथीने ते केलेही होते. तिच्या दुर्दैवाने व बरे प्रत्यय आल्यामुळे आयुर्वेदाचे दिवस फिरले.
शेवटी आयुर्वेदाचे कोरिलेशन पाश्चात्य लोक मानू लागले व अनुकरणाने आता आपणही.
शिवाय बारा राशी असताना गुरूच्या सर्वराशिभ्रमणाला १३ वर्षे लागत होती त्याची तेराव्या राशीमुळे १४ झाल्याचे अजून तरी दिसत नाही. ग्रहगणित चुकीचे ठरले असेही वाटत नाही. (तेरावी रास कशी आली व त्यामुळे कोणता फरक पडला हे तपशीलवार समजून घ्यायला आवडेल.)
अर्थात फलज्योतिष खरे की खोटे हा वाद मीही काठावर उभा राहून स्वारस्याने बघत आहेच. पण वर तडकाफडकी लावल्याप्रमाणे निर्णय लागतो असे अजून तरी पटत नाही.
दिगम्भा