मी राजेंद्र. सध्या इटलीमधे पदार्थविज्ञानामधे संशोधन. सविस्तर माहीती परिचयात आहेच. मला उरलेल्या आयुष्यात काही गोष्टी करायला आवडतील. जमतील की नाही माहीत नाही पण फ़िकीर नाही. प्रयत्न केल्याचा आनंद तर असेल.
"टू डू" लिस्ट
बंगाली शिकून टागोर बंगालीत वाचायचे आहेत.
फ़्रेंच शिकून सार्तचं लिखाण मूळ फ़्रेंचमधे वाचायचय.
कंबोडियाला जाऊन प्राचीन ख्मेर संस्कृतीचे भव्य अवशेष बघायचेत.
आफ़्रिकेतील अतीप्राचीन मानवाचे अवशेष बघायचेत.
विपश्यना करुन बघायची आहे.
एक पुस्तक लिहायचय.
सध्यासाठी एवढ पुरे. ः)
हजारों ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहोत निकले मेरे अरमा लेकिन फ़िर भी कम निकले