असं काय बुवा प्रसारमाध्यमांसारखी काटछाट करुन माहिती देताय?

असो. गाळलेली बातमी मी पुरवते.

दरम्यान संमेलनाच्या दिवशी स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी कुर्ता पायजमा घालावा असा प्रस्ताव साती व संवादिनीने मांडला होता.

प्रकार थोडा वेगळा होता बरं का मंडळी.

दरम्यान संमेलनाच्या दिवशी  अवधूत कुलकर्णी आणि सर्वसाक्षींनी संमेलनाची सुरुवात शेगावच्या गजानन महाराजांच्या "गण गण गणात बोते" या पदाने करण्याचा हट्ट धरला होता. बहुतेक मनोगतींची त्याला ना दिसली नाही.

पण संजोपने उठून निषेध प्रस्ताव मांडला. "मनोगतावरच्या श्रद्धेच परीक्षण करण्यासाठी मला परीक्षक नेमा असा व्य. नि. मी प्रशासकांना पाठवला होता पण ते नको तिथे निःपक्षपातीपणा करतात अस वाटत. मी नाही तुम्हाला सामिल होत जा!!" अस त्राग्याने म्हणून संजोप तिथून उठून जायला निघाला.

तोपर्यंत पुनश्च (पुढील वादासाठी) एकत्र झालेल्या प्रियाली आणि सचिनने, संजोपची कशीबशी समजूत काढून त्याला परत आणले.

स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी कुर्ता पायजमा घालावा असा प्रस्ताव साती व संवादिनीने मांडला होता. "यालाच मी झब्बट म्हणत होतो...." असे सन्जोप तात्याच्या कानात कुजबुजला.

-----

मनोगतींचे चित्रण झक्कास. पुढचा भाग लवकर लिहा. गाळलेल्या जागा भरायला आम्ही आहोतच.

प्रियाली