प्रियाली

तुझी स्पष्ट आणि परखड मतं वाचली आणि पटलीही.  स्त्रीवर अधिकार गाजवणारे किंवा स्त्रीला अवाजवी देवरूप देणारे दोघेही विकृतच म्हटले पाहिजेत. 

हेच कारण सर्वस्वी बरोबर आहे. खालच्या शरीरावर जे डोके आहे त्याचा उपयोग स्वतःला सावरण्यासाठी/ थांबवण्यासाठी (control) करण्यासाठी करता येतो हे जेव्हा माणसं विसरतात तेव्हा बलात्कार होतात.

बरोबर.  बलात्कारच नाही पण स्त्रियांची टिंगल करणं किंवा त्यांच्याकडे बघून अचकट विचकट बोलणं किंवा अंगविक्षेप करणं हेही तितकंच मानसिक आजाराचं लक्षण म्हणता येईल.

- मिलिंद

टीप - मी "जाणकार" म्हणून माझं मत देत नसून जे वाटलं ते लिहितोय.  तू "जाणकार" या शब्दाला अवतरण चिन्हात टाकल्यामुळे बऱ्याच जणांची प्रतिक्रिया देण्याची हिंमत झाली नसेल !