"लग्नातले झब्बे आम्हाला आता बसत नाहीत" मागच्या रांगेतून कुशाग्र ओरडला. बराच वेळ आपण कुणाला अनुमोदन दिले नाही हे लक्षात येऊन तात्या "सहमत, सहमत" असे ओरडला. पण वात्रट आणि टग्या त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघू लागले, तसा तो वरमून खाली बसला.
"ज्याच्या त्याच्या हातात
आपापली रेखा...."
"बोंबला, ज्याच्या त्याच्या हातात रेखा, तर अमिताभच्या हातात काय? खि.. खि.. खि..." टग्याचा आवाज अज्जुकाने ओळखला.
ही मिसळ नव्हे, हा आत्मा हो तात्याचा
"तात्याचाच का म्हणून?" कुणीतरी ओरडले. क्षणभर चित्त गोंधळला, पण क्षणात स्वतःला सावरून त्याने परत सुरुवात केली. "तात्याचा कुठं म्हणालो मी? नीट ऐका.."
ही मिसळ नव्हे, हा आत्मा होता त्याचा
चाखून पाहिली मी, उसळले पित्त
"तंबाखूचे दुष्परिणाम इथे वाचा." 'तो'. दुसरं कोण असणारं?
मी वैज्ञानिक आहे सन्जोप. तत्वात बसणार नसेल ते काही करणार नाही मी. शेवटी तत्वं महत्वाची. गीतेत म्हटलंच आहे..." विनायक गंभीरपणे म्हणाला.
लई झकास! हहपु!
"तरण्याताठ्या पोरींना चारचौघात असं एकेरी बोलावणं शोभत का या अप्पा भिंगार्ड्याला?" सन्जोपने विनायकला कोपऱ्यात घेतले होते. "यात असूयेचा भाग नाही ना सन्जोप? नाही, मझ्या शोधनिबंधासाठी हे महत्वाचं आहे म्हणून विचारतो." विश्वास मध्येच म्हणाला.
'असा मी असामी' आणि 'बटाट्याच्या चाळी'चा (नागूतात्या आढ्ये? की कुशाभाऊ अक्षीकर? बहुतेक नागूतात्याच! घरी जाऊन पुन्हा वाचून खात्री करून घेतली पाहिजे!) हा मनोहर संगम आवडला!
- टग्या.