महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र(सोलापूर) हा भाग विदर्भापेक्षा दुष्काळी आहे. तिथेही शेतकरी कर्जबाजारी आहेत, तरीपण या भागात कोण्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असा एकही प्रकार घडत नाही. या भागात शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी सतत काही-ना-काही धडपड करत असतात. वेळ आलीतर काही दिवस गाव सोडून शहराकडे धाव घेतात, तेथे जाऊन काही-ना-काहीतरी धडपड करतात, परत गावी येऊन शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करतात.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कोणते सरकारे धोरण कारणीभूत आहे की नाही हा चर्चेसाठी अर्थातच वेगळा विषय ठरेल. पण त्याचबरोबर तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची पण तितकीच गरज आहे असे वाटते.

--- संतोष जाधव