शरण्या,

पुरणपोळीची पाककृती सुंदर दिली आहे. केशर घालतात ही नविनच माहीती मिळाली. धन्यवाद.

चाळणीतून पाणी पूर्णपणे निथळले की डाळ आधी पुरणयंत्रातून वाटून घ्यावी व नंतर गुळ घालून शिजवावी. गुळ घालून डाळ आधी शिजवली व नंतर पुरणयंत्रातून काढली की गरम असताना पटकन होते, पण नंतर गार झाल्यावर खूप वेळ लागतो व पुरणयंत्रातून फिरवायला कठीण जाते. अजून एक पद्धत माहिती झाली आहे ती म्हणजे पुरण मायक्रोवेव्ह मधे शिजवणे, पण कशा प्रकारे शिजवायचे ते पुन्हा एकदा बहिणीला विचारून सांगेन.

रोहिणी