तसेही आणखी प्रतिसाद येत नाहीत असे दिसल्याने मंगळवार संध्याकाळची वाट न पाहता उत्तर आजच छापून मोकळे व्हावे म्हणतो.

समजा घड्याळजीने सगळ्या घड्याळांत बरोबर वेळ लावायचीच, असे ठरवले. आता त्याने कितीही प्रयत्न केला, तरीही (काही अंशी मानवी त्रुटी[human error]मुळे) सगळी घड्याळे सेकंदापर्यंत किंवा मायक्रोसेकंदापर्यंत अचूक (आणि तितक्याच अचूकतेने एकमेकांशी) जुळतीलच, असे नाही, आणि जुळलीच, तरी (काही अंशी वेगवेगळ्या घड्याळांच्या गतींतल्या अंगभूत सूक्ष्मफरकांमुळे) त्यांत रोज किंचित फरक पडत जाणार. अर्थात हा वेगवेगळ्या घड्याळांत दर्शवल्या जाणाऱ्या वेळांमधील फरक फार मोठा नसेल; कदाचित एखाददुसऱ्या मिनिटाचासुद्धा असू शकेल.

इथपर्यंत सर्व ठीक?

आता समजा, भिंतीवरील (विक्रीसाठी असलेल्या) शंभर घड्याळांपैकी पंचवीस घड्याळे ही टोल्याची (दर तासाला ठोके देणारी) घड्याळे आहेत. इथे खरी गंमत सुरू होते.

कल्पना करा, दुपारचे बारा वाजले आहेत, आणि ही सर्व टोल्याची घड्याळे थोड्याशा phase differenceने ("हम होंगे कामयाब" स्टाईल) एकदम/एकापाठोपाठ एक ठोके देऊ लागली आहेत. कोठल्या घड्याळजीचे डोके फिरणार नाही? (थोडक्यात बारा वाजता डोके फिरायला घड्याळजी हा सरदारजीच असला पाहिजे, असे नाही.)

आणि हा त्रास केवळ बारा वाजताच आहे असे नाही, तर दर तासाला आहे. फक्त बारा वाजता या त्रासाची परमावधी होते, इतकेच!

त्यापेक्षा random पद्धतीने प्रत्येक घड्याळात वेगवेगळी वेळ लावून घड्याळजी ठोके stagger करणे अधिक पसंत करतो. (मराठी?)

- टग्या.

(डिस्क्लेमर: मी किंवा माझ्या मागील दोन [ज्ञात] पिढ्यांमध्ये कोणीही घड्याळजी नसल्यामुळे, हे उत्तर केवळ ऐकीव माहिती आणि सेकंडहँड [श्लेष अभिप्रेत] तर्कावर आधारित आहे.)