प्रेरणाताई,
कविता छान आहे.आवडली. शेवटच्या द्विपदीत यमकाला ज़रा गालबोट लागल्याचे (ज़रासे) दुःखही झाले.
'भुक' ऐवजी 'भूक', 'सार' ऐवजी 'सारे' यांसारखे काही बदल केल्यास शेवटच्या दोन द्विपदींतून एक सुंदर मुक्तक जन्मते आहे (, पण ज्याची पहिली ओळ काहीशी अधांतरी राहण्याची शक्यता आहे), असे वाटले. चूभूद्याघ्या.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.