कायद्याने बलात्कारासाठी दिली जाणारी शिक्षा तीव्र स्वरुपाची करायला हवी हे तर खरेच, पण बलत्कारित स्त्री कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन देखील बदलायला हवा आहे. गुन्हा तिच्या बाबतीत झाला आहे, तेंव्हा तिच्याबद्द्ल घृणा न दाखवता ती त्या गुन्हेगार पुरुषाबद्दल दाखवायला हवी. पण प्रत्यक्षात तोंड लपवावे लागते ते त्या स्त्री ला!
'पुरुष' नाटकात नाना पाटेकर सुरुवातीला प्रेक्षकांना एक आवाहन करत असत की, 'चुकीच्या ठिकाणी हसू नका. या नाटकाला आलेल्या प्रेक्षकांकडून निदान तेवढ्या तरी संवेदनशीलतेची अपेक्षा आहे.'
स्वाती