प्रेरणा,
सूचना स्वीकारलीत त्याबद्दल धन्यवाद!
नको येऊस संगती
सारे काटे माझ्यापाशी...
तुझ्या शीतल प्रीतीला
सल सोसावी रे कशी...
--यात काटे व सल हे जरी सुसंगत असले तरी 'शीतल' हे 'आग' शी सुसंगत आहे. त्यामुळे
नको येऊस संगती
सारे काटे माझ्यापाशी...
तुझ्या कोमल प्रीतीला (किंवा तुझ्या नाजुक प्रीतीला)
सल सोसावी रे कशी.
... यात काटे,कोमल/नाजुक,सल ही सर्व एकमेकाशी संबंधित कल्पना आहेत जश्या वणवे,शीतल,आग इ सर्व एकमेकाशी संबंधित कल्पना आहेत.
जयन्ता५२