समाजात शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. समाजात अनेक विषय असे आहेत की त्यांच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा त्यातीलच एक. मला वाटते आपण सर्वजण अन्नच खातो. केवळ मांस भक्षण करुन जगता येणे अशक्‍य आहे. म्हणून ते अन्न देणाऱ्या, निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका आणि त्याच्या व्यथा महत्वाच्या ठरतात आणि हा विषयही तितकाच महत्वाचा ठरतो. मनोगत वर कुठले विषय चर्चीले जावे याविषयी काही बंधने किंवा आक्षेप मुळीच नाही. परंतु गेल्या काही दिवसांत ज्या काही चर्चा या ठिकाणी गाजत आहेत त्यात विशेषत: वैवाहिक जीवनापूर्वी लैंगिक संबंध असावेत की नको? किंवा स्त्रीयांवरील बलात्कार यांसारख्या सवंग अशा चर्चा येथे घडल्या आहेत. त्यांना मिळणारा भरघोस प्रतिसाद पहाता कुठेतरी मनात अस्वस्थ झाले आणि म्हणूनच या विषयाचे महत्त्व पटावे यासाठीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या की लैिगक विषय महत्वाचे काय? अशा पद्धतीचा उपरोधिक मथळा दिला आहे. आपल्यासारखे सुजाण नागरिक समजून घेतील ही अपेक्षा !