एक शंका आहे. तज्ञांनी मदत करावी.

माझ्या मते 'संभावना' याचा अर्थ सादरसत्कार करणे असा आहे. त्याचा 'संभावना करणे' असा उपहासात्मक वाक्प्रचार तयार झाला आहे. हीच गोष्ट 'संभावित' या शब्दाविषयी. मूळ अर्थ 'सभ्य' अथवा  समाजात मान असलेला मनुष्य. त्यापासून 'संभाविताचा आव आणणे' असा वाक्प्रचार निर्माण झाला. अलिकडे याऐवजी फ़क्त 'संभावितासारखा' असा शब्द रूढ झाला आहे. हा तुलनात्मक आणि नकारात्मक आहे. परंतु नेमके हेच विसरून हल्ली 'संभावित' हे विशेषणच नकारात्मक झाले आहे.

चू. भू. द्या घ्या.