वात्रट्दादा अहो 'अमुक भाषेचे आक्रमण तमुक भाषेपेक्षा अधिक भयानक' याचा अर्थ तमुक भाषा अधिक जवळची असा कसा काय होतो बुवा?. मला वाटते की याचा अर्थ फ़क्त इतकाच होतो की एका भाषेचे आक्रमण दुसरीपेक्षा अधिक व्याप्तीचे आणि अधिक नुकसान करणारे आहे. यात दोन्ही भाषांच्या तुलनेचा प्रश्न येतोच कुठे? मला नाही वाटत वरील कोणताही प्रतिसाद हिंदीपेक्षा इंग्लिश चालेल असे म्हणतोय. वाचून पहा बरं पुन्हा.