साती, काव्य ठीकच आहे.

मात्र 'कवळी कवेत' ह्या शब्दांखेरीज ह्या कवितेचा तिच्याशी काही संबंध दिसत नाही. 'कवळी कवेत' हे शब्द वापरून केलेली नवी कविता ठीक आहे.

विडंबन विसंगतीचे करतात, दोषांचे करतात. मूळ कवितेतील कशाचे विडंबन इथे केलेले आहे?

'साती' विडंबनांचा तुज सोस फार झाला ।
'कवळी कवेत' कविता, त्यांचा प्रवास सारा ॥

धृपदातील 'बिचारा', 'तगडा जवान झाला' ।
तुझिया विडंबनाचा, आगळा प्रवास झाला ॥

दैवास दूषणेही, देऊन चार शेर ।
तो सत्तरी बिचारा, नंतर जवान झाला ॥