1) अपत्य असलेल्या मुलाशी कोण मुलगी लग्न करेल? त्यात त्या तान्ह्या मुलाचे भविष्याचा आणि नव्या नवरीच्या भविष्याचाही प्रश्न उदभवतो. ताई आपण या जागी असत्या तर अशा मुलाशी लग्न केलं असतं का?
2) दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपला समाज खरंच इतका पुढारलेला आहे का? आणि समजा मुलीला अपत्य असते, तर मुलाने किंवा तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असता का? वास्तवात या गोष्टी अभावाने घडतात. म्हणूनच आपण जरी 21 व्या शतकात असलो तरीही प्रत्यक्षात विचारसरणीने जुन्याच काळात वावरत आहोत. आपली संस्कृति अजूनही पुरुषप्रधान संस्कृति आहे. या बद्दल आपल्याला आणखी काही स्पष्टीकरण देणे आवश्यक नसावेसे वाटते.