रोहित रामचंद्रय्याजी, तुमची जिज्ञासा कौतुकास्पद आहे!
कन्नड भाषक असूनही पूर्णामायची लेकरे वाचता आहात ही आनंदाची गोष्ट आहे.
तुमचे हार्दिक अभिनंदन.
१. गुदडी (गुदडीपर्यंत हाग्याले जाता येत नाही)
२. हाग्या
३. वख्खर (हॉऊ शकेल तर इंग्लीष मधे अर्थ पाहिजे)
४. बैलांच्या खुब्यांत परान्यांचे खॉचे मारून त्यांना धावड्वीत होती.
५. नात्वांना आपल्यासमोर बसवून धमन्या पळवीत होती.
६. शिंदी
७. गॉधनॅ
८. उंबरॅ
९. नुसतीं पराटीचीं वाळलेलीं बुरखुंडॅ
१०. बोहारी
१. गुदडी = गावाकडले लोक परसाकडेसाठी ज्या मैदानावर जातात ते मैदान.
२. हाग्याले = हागायला, हाग्या मार = हागायला लागेल असा मार
३. वख्खर = tool for ploughing the field
४. खुबा म्हणजे बैलाचे वशिंड असावे, त्यावर पराणी म्हणजे टोकास लोखंडी टोचणी लावलेली काठी, तिने वशिंडावर टोचणी दिल्यास बैलांना जोराने धावविता येते.
५. नातवांना आपल्या समोर बसवून धमन्या चालवित होती.
६. शिंदीचा संतोष जाधवांनी दिलेला अर्थ बरोबर आहे.
७. गोधने = live stock (particularly cows)
८. उंबरे = औदुंबराची फळे
९. पऱ्हाटी म्हणजे कपाशीची झुडुपे/झाडे. कापूस तोडून झाल्यावर उरलेल्या पऱ्हाटीस बुरखुंड म्हणतात.
१०. बोहारी = एक भटकी जमात