१) लग्न माझ्या मर्जी प्रमाणे असेल तर मी केल असतं. विधुर, अपत्ये असलेला, वयाने मोठा असलेला किंवा लहान असलेल्या माणसाशी मी माझ्या मर्जी प्रमाणे लग्न केलं असत. मला त्यात काही वावगं वाटत नाही. आई नसल्याने त्या तान्ह्या मुलाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेलच. आयुष्यात प्रश्न कोणाला नसतात?
मुलीला अपत्य असते, तर मुलाने किंवा तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असता का?
२) अस केल्याची अनेक उदाहरणे माझ्या पहाण्यात आहेत. बऱ्याच जणांच अगदी बरं चाललं आहे. जुनी विचारसरणी सोडून जर २१ व्या शतकात आहोत हे खर करायच असेल तर अशी आडकाठी का?
असो. ही माझी व्यक्तिगत मते आहेत.
----
अवांतर - मनोगत बदलले. प्रतिसादांची उघड-झाप होते आहे. आनंद झाला.