मी मनोगतावर नविनच दाखल झाले आहे. सन्गणकाची ओळखही नविनच.त्यामुळे थोडीशी चाचपडत आहे.

मनोगतावर  नीळकन्ठावर चर्चा वाचली. एक छोटासा श्लोक (मूळ सन्स्क्रुत श्लोकाचे भाषान्तर ) पाठवत आहे.

सर्प गळ्यातील गिळू पाहतो गजवाहन त्या उन्दराला

 षडाननाचा मोर पाहतो भक्षाया त्या सर्पाला

सिन्ह उमेचा खाऊ बघतो गणपतीच्या गजवदनाला

आणि पहातो भक्षायाला महेश्वराच्या नन्दीला

जटेतल्या गन्गेचा मत्सर साक्षात पार्वतीदेवीला

शीतल चन्द्राचाही मत्सर भाळीच्या नेत्राग्निला

सतत चालल्या ग्रुहकलहाने महादेवही चिडचिडला

उद्वेगुनिया घटाघट मग जहाल हालाहल प्याला.