1) अपत्य असलेल्या मुलाशी कोण मुलगी लग्न करेल?

अशा मुलांचीही लग्न होऊन सुखाने संसार करताना मी पाहिलेलं आहे. त्यात नवल ते काहीच नाही.
 
त्यात त्या तान्ह्या मुलाचे भविष्याचा आणि नव्या नवरीच्या भविष्याचाही प्रश्‍न उदभवतो.

प्रश्न उद्भवतो की संपतो?

ताई आपण या जागी असत्या तर अशा मुलाशी लग्न केलं असतं का?

केवळ उपरोल्लिखित माहितीच्या आधारावर नक्कीच नाही. लग्नाचा विचार हा अनेक जीवांच्या अख्ख्या आयुष्याशी निगडीत निर्णय असतो, तो इतक्या तुटपुंज्या माहितीआधारे घेणे योग्य होणार नाही असे वाटते. अर्थात मला, त्या मुलाला आणि आमच्या घरातल्यांनाही एकंदरीत सगळे आवडल्यास लग्न करायला काहीच हरकत नाही.

2) दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपला समाज खरंच इतका पुढारलेला आहे का?

ते आपल्यावरच अवलंबून असते. समाज आपणच तर बनवत असतो शेवटी.

समजा मुलीला अपत्य असते, तर मुलाने किंवा तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असता का?

नक्कीच. माझ्या स्वतःच्या आईबाबांचे जिवंत उदाहरण आहे माझ्याकडे.

म्हणूनच आपण जरी 21 व्या शतकात असलो तरीही प्रत्यक्षात विचारसरणीने जुन्याच काळात वावरत आहोत.

माफ करा पण आपल्या वाक्यातील 'आपण'मध्ये माझा समावेश नाही, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.