इथे अमेरिकेमध्ये विशेषतः टेक्सास मध्ये चिलि म्हणजे राजम्यासारख्या कडधान्याची मसालेदार उसळ असे सर्वमान्य आहे.  त्यामध्ये मांसखंड (गाय आणि डुक्कर) असतातच.  ते न घालता केले तर त्याला शाकाहारी चिलि म्हणतात.  त्यामध्ये लाल मिरची असते, पण बरेच वेळा ती जास्त तिखट नसते.

इथे चिलि हॉट डॉग म्हणजे नेहमीच्या हॉट डॉग मध्ये अशी वर उल्लेखलेली चिलि घालून द्यायची पद्धत आहे.  सर्वसाक्षींनी जेव्हा चिलि चीज़ टोस्ट हा पदार्थ दिला तेव्हा मला एकदम तो तशा प्रकारचा पदार्थ असेल असे वाटले होते.

इकडे आपल्याकडच्या मिर्चीला चिलि पेपर असे म्हणतात.  त्याचे बेल पेपर, ऑर्टेगा, हालाप्यिनो, सोरॅनो, हॅबारनॅरो असे भोपळी मिर्चीपासून तिखटपणांत वाढ होत जाणारे प्रकार असतात.  या विषयीचा एक दुवा इथे जमला तर देऊ इच्छितो.

http://www.chili-pepper-plants.com/html/chili_peppers.html

(सर्वचवसमभावी) सुभाष