पुरणपोळीची पाककृती छान आहे..परन्तु त्यात मिरेपूड का बरे घालतात??
मी नेहेमी मायक्रोवेव्ह मध्ये पुरण नेहेमी करते.ड़ाळ गुळाचे प्रमाण वरीलप्रमाणेच घेणे..डाळ कूकर मध्ये शिजवून घ्यावी. चाळणीतून पाणी निथळून काढावे.̱ डाळ गरम असतानाच त्यात गूळ घालून मिक्सर मधून बारीक करुन घ्यावे.वेलदोडयाची पूड केशर घालावे. आणि मग मायक्रोवेव्ह मध्ये चालेल अशा काचेच्या भान्ड्यात ते मिश्रण ठेवावे.५ मिनिटे मायक्रोवेव्ह चालू करावा..थाम्बल्यावर ते मिश्रण ढवळावे..परत ५ मिनिटे मायक्रोवेव्ह चालू करावा..थाम्बल्यावर ते मिश्रण ढवळावे.. असे २-३ वेळा करावे..१ वाटी डाळीचे पुरण करायला साधारण १२-१५ मिनिटे लागतात.ढ़वळताना चमचा पुरणात उभा राहिला म्हणजे पुरण शिजले असे समजावे. ही पद्धत खूप सोपी आहे..कारण शिजवताना सतत हलविण्याची गरज नाही आणि पातेल्याला चिकटायची किन्वा लागायची भीती नाही.