आजच्या घडीला मनोगतचे असलेले रूप छान आहे.

एक तक्रार : सुपूर्त केलेल्या लेखनाला एकही प्रतिसाद आलेला नसल्यास त्याचे पूर्ण संपादनहक्क ( लेखनात बदल, प्रकाशित/अप्रकाशित ठेवण्याचा हक्क वगैरे ) संबंधित लेखनकाराला मनोगतवर उपलब्ध आहेत. येऊ घातलेल्या ऊर्ध्वश्रेणीकरणात असेच अधिकार प्रतिसाद पातळीवरदेखिल मिळतील अशी अपेक्षा असताना आधी असलेला प्रतिसाद बदलण्याचाही मार्ग सद्ध्या बंद झालेला आहे. हा बदल जाणूनबुजून करण्यात आलेला आहे की कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे तात्पुरता आलेला आहे, हे समजण्यास मार्ग नाही. या बदलाने खूप अडचण होते आहे.