गोळेकाका काही गोष्टी हलकेच घ्यायच्या असतात हो , प्रत्येकवेळी इतकं गंभीर होऊन कसं चालेल?
बाकी थोड्या दिवसांनी नरेंद्र काकांच्या सातीवरील/ सातीसाठी कविता असं एखादं पुस्तक प्रसिद्ध होऊ शकेल. (त्वरा करा , नावे नोंदवा.)
विडंबन विसंगतीचे करतात, दोषांचे करतात. मूळ कवितेतील कशाचे विडंबन इथे केलेले आहे?
'विडंबन करताना मूळ कवितेतील दोषांचं करायचं असतं' हा शोध नव्याने लागला. आता प्रेरणादेवींच्या कवितेतच मुळात काही दोष मला वाटला नसेल तर त्यांचं विडंबन कुठून करणार मी?
'कवळी कवेत' ह्या शब्दांखेरीज ह्या कवितेचा तिच्याशी काही संबंध दिसत नाही. 'कवळी कवेत' हे शब्द वापरून केलेली नवी कविता ठीक आहे.
हे मात्र चूक हो, सगळ्या द्विपदी (शेवटची सोडून ) मूळ कवितेतील बरेचसे शब्द वापरून केल्या आहेत.
कवितेचा एकंदर "रोख" पाहता सगळीच कडवी फिट बसताहेत
या टगेरावांच्या वाक्यावरून लोकांनाही या कवितेचे शब्द मी उचलले आहेत हे कळलंय असं मला वाटतं.
आता कवितेच्या अर्थाविषयी- बिचारा आहे हे कळत असून, दात गेल्यावर, डोळे अधू झाल्यावरही जीवनाचा आनंद घेऊ पाहणारे आजोबा मनाने तगडे जवानच आहेत. 'ऐकू येत नाही म्हणून वाईट गाण्यांपासून कान वाचले' अशी त्यांनी स्वतःची समजूत घातली आहे.
(शशांकरावांसारखा माझाही फॅनक्लब असता तर स्वतःच्या कवितेचं रसग्रहण लिहायची वेळ आली नसती माझ्यावर !) :) :D
तुम्हीच लिहिलेल्या जरा या कवितेच्या माझ्या प्रतिसादातल्या दुसऱ्या आजोबांसारखे आमचे हे आजोबा आशावादी आहेत.
आणि तुम्ही फार मनावर घेऊ नका हो; तात्यांसारख्या कवितेतलं ओ की ठो न कळणाऱ्या लोकांना "कवळी कवेत " चा हा अर्थ वाटला , त्यांना टोले हाणायला ही कविता आहे.
साती काळे.