१. मुलीने आपल्या मर्जीने विवाह करण्याचा मुद्दा मान्य.
२. सापत्य पतीची निवड करताना सावत्र आई स्वीकारण्याला तो मुलगा/ ती मुलगी तयार होईल का, हा विचारही विवाह करणाऱ्या त्या वधूने करायला हवा असे वाटते. आपली आई बदलली आहे आणि नवीन आई स्वीकारताना सख्ख्या आईशी तो तूलना करणार हे लक्षात घ्यायला हवे. मुळात ही आई तुझीच आहे हे त्याला वडिलांकडून व्यवस्थित पटवून देता आले पाहिजे.
शिवाय नव्या जोडप्याला होणाऱ्या मुलाबाबत काय निर्णय घेणार, जर मूल हवे असेल तर सावत्रपणाची वागणूक पहिल्या पत्नीच्या मुलाला मिळणार नाही याची काय खात्री असेही मुद्दे विचारात घ्यायला हवेत.
३. काही अपवाद असतील पण तो नियम नाही, त्यामुळेच आजही आपण निदान विवाहाच्या संदर्भात जुन्याच विचारांचे आहोत, हे मान्यच करायला हवे.
अवधूत.