आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण;
वेदांचे वचन न कळे आम्हा।
आगमाची आढी निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा॥
योग याग तप, अष्टांग साधन
न कळेची दान व्रत तप आम्हा॥
चोखा म्हणे माझा, भोळा भाव देवा,
गाईन केशवा नाम तुझे॥