तुमचं विवेचन एकदम १००% पटलं. मीही मराठी शाळेत, अगदी मराठमोळ्या वातावरणात शिकलो. माझं किंवा माझ्या वर्गातील/ यत्तेतील कोणाही मुलाचं/ मुलीचं इंग्रजी माध्यमात न शिकल्यामुळे कुठेही काहीही अडलं नाही. उलट आमच्या यत्तेतील अधिकाधिक मुलं आज परदेशात, किंवा भारतातही राहून आपापल्या क्षेत्रात चांगली लक्षणीय कामगिरी करत आहेत, आणि त्यात त्यांच्या तथाकथित व्हर्नॅक्युलर माध्यमाचा त्यांना कधी तोटा झाल्याचं ऐकिवात नाही. शिवाय, माझ्या स्वत:च्या अनुभवाप्रमाणे जर मातृभाषा चांगली अवगत असेल तर इतर भाषा - भारतीय वा परकीय - आत्मसात करणं जास्त सोपं जातं, आणि हा परदेशात, विशेषत: ज्या देशांत इंग्रजी बोलली जात नाही, अशा देशांमध्ये फारच महत्त्वाचा फायदा ठरतो. तेव्हा, माझ्या मतेतरी मराठीला मरण नाही, जोवर मी माझ्या मुलाला/ मुलीला मराठीत शिकवायच्या ऐवजी कॉन्व्हेंट मध्ये पाठवत नाही तोवर. आणि जर आई वडलांना इंग्रजी/ इतर परकीय भाषा येत असतील, तर त्या त्यांनी आपापल्या मुलांना घरी, विशेष कष्ट घेऊन शिकवाव्यात की! नुसतं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून भागणार नाही त्यासाठी.