श्री. संतोष,
दुर्दैवाने मराठवाड्यातही शेतकरी आत्महत्या करत आहेत. मे व जून मध्ये तेथे जवळपास १० (सरकारी आकडा) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
मंत्री साहेबांच्या दौऱ्यावर जेवढा खर्च होतो आहे तवढा तरी शेतकऱ्यांवर खर्च होणार आहे का नाही माहित नाही. आणि होईल तो "खर्च" त्या बापड्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल का नाही हे पण कोणी सांगू शकत नाही. सगळा आनंदी आनंद आहे "काळ्या साहेबांच्या" दरबारी. (गोरे साहेब गेले अन हे काळे साहेब आता राज्य करत आहेत, म्हणून हा शब्द प्रयोग)