इथे मराठी भाषा, व्यवहार, साहित्य आणि संस्कृती  ह्यावर अधिकाधिक चर्चा व्हाव्यात असे मला वाटते.
-- त्याबरोबरच सामाजिक विषयावर झाल्याने तोटा काय होणार आहे का? झाला तर फायदाच होईल. अशा चर्चांनी एखाद्याचे मन जरी समाजकार्यासाठी उद्युक्त झाले तरी चांगलेच आहे ना!
आणि समजा तुमचा हा नियम मनोगतवर लागू करायचा म्हटले तर आर्ध्यापेक्षा अधिक भाग कापून टाकावा लागेल. ः)

बाकी चर्चा काय बाहेर वाहिन्यांवर, पेपरांत सारख्या होतात. आणि आधीच त्यांचा चावून चोथा झालेला असतो.
-- तसे म्हणायचे तर "भाषा, व्यवहार, साहित्य आणि संस्कृती" या विषयांचा सुद्धा तेथे "चोथा" झालेलाच असतो.

वाहिन्यांवर तसेच पेपरांत प्रत्येक सामान्याला आपल्या प्रतिक्रिया देता येणे सोयीचे असतेच असे नाही. मनोगत हे सामान्यांच्या प्रतिक्रियेसाठी छान व्यासपीठ आहे त्यामुळे येथे प्रत्येकाला त्याची मते मांडता यावीत असे वाटते.